Tag Archives: म्हणी व वाक्प्रचार

अकरा माणसे अकरा रस्ते

अकरा माणसे अकरा रस्ते ———————- हा मथळा वाचून कुणालाही नक्की वाटेल की नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताच्या ११ खेळाडूंच्या विस्कळीत कामगिरीवर हे भाष्य आहे. पण ते तसे नाही. तसे वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा. मराठीतील “व्यक्ती तितक्या प्रकृती” ह्या अर्थाच्या … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , , | 2 प्रतिक्रिया

करावे तसे भरावे

करावे तसे भरावे ———————————— ह्या आठवड्यात जवळ जवळ प्रत्येक दिवशी वृत्तपत्रांचे मथळे असे होते की रोज नेमकी हीच म्हण आठवावी. मग क्रिकेट नौटंकीच्या ‘कमिशनर’ ची झालेली हकालपट्टी असो, विश्वासार्हतेचा ‘वि’ देखील माहीत नसलेल्या तथाकथित मित्राने राष्ट्रीय पक्षाला मारलेली टांग असो … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , , | 9 प्रतिक्रिया

पाप आढ्यावर बोंबलते…

पाप आढ्यावर बोंबलते… ——————————– ही तशी कमी परिचयाची म्हण. एकंदरच भारतीय जनमानसाच्या स्वभावात कुणाच्या पापाचा उघड उल्लेख करणे तितकेसे बसत नाही. पाप – पुण्य ही व्यक्तिगत बाब मानण्याकडेच बराचसा कल. त्यामुळे अन्य भारतीय भाषांतुनही ह्या अर्थाच्या म्हणी तशा अभावानेच आढळतात. … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , , | 2 प्रतिक्रिया

बोलाचीच कढी बोलाचाच भात.

बोलाचीच कढी बोलाचाच भात. ——————————– ज्यांनी गेल्या शनिवारचा स्तंभ वाचला असेल त्यांना आजचे लेखन हे मागच्याच स्तंभाचा पुढला भाग आहे असे वाटल्यावाचून राहणार नाही. प्रत्यक्ष काही उचलून न देता केवळ गोडगोड बोलणार्‍या सर्वांनाच शाब्दिक माराचा अखिल भारतीय प्रसाद मिळाल्याचे दिसून … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , , | १ प्रतिक्रिया

‘फोनो’ आणायचा पण वाजवायचा नाही

‘फोनो‘ आणायचा पण वाजवायचा नाही ————————————————- एक गोष्ट सुरूवातीसच स्पष्ट करायला हवी. शीर्षकातील ही म्हण बहुधा कुठल्याही म्हणींच्या संग्रहात मिळणारी नाही. पूर्वी एका मराठी मासिकात नवी म्हण देणार्‍याला एक रुपया व अंक देण्याची प्रथा होती. ही म्हण त्या मासिकातलीही नाही. … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , | 2 प्रतिक्रिया

बेडूक फुगला म्हणून बैल होत नाही

बेडूक फुगला म्हणून बैल होत नाही ————————————– स्वत:च्या क्षमतेपेक्षा भरमसाठ वल्गना करणार्‍याबद्दल वरील म्हण मराठीत वापरली जाते. कन्नड मधे, कदाचित ही फारच अतिशयोक्ती वाटल्यामुळे, आणखी एक म्हण प्रचलित झाली ती ‘बेडूक-बैला’ ऐवजी ‘कोल्हा-हत्ती’ घेऊन; म्हण आहे – “कोल्हा कितीही मोठा … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

चढेल तो पडेल

चढेल तो पडेल ———————————————– हा स्तंभ प्रकाशित होईल तेव्हा केंद्रीय अंदाजपत्रकाच्या म्हणजे बजेटच्या चर्चा जोरात सुरु असतील. साधारणपणे बजेटच्या चर्चांचा एक संदर्भ शेअर बाजारातील चढ उताराशीही असतो. आयुष्यातले चढ-उतार हे अटळ आहेत हे सांगणार्‍या म्हणीही आपल्याला बर्‍याच भारतीय भाषांत आढळतात. … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged | यावर आपले मत नोंदवा

लेकी बोले ‘बहु’स लागे?

लेकी बोले ‘बहु’स लागे? माझा इशारा ज्या म्हणीकडे आहे ती म्हण तर तुमच्या लक्षात आली आहेच. मराठी मध्ये ‘लेकी बोले सुने लागे’ ही म्हण, दूरदर्शन च्या परिभाषेत सांगायचे तर, मराठी मधील सर्वोच्च टी.आर्.पी. असलेली म्हण असेल. देशभरातील अनेक भाषांमध्ये ह्या … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , | १ प्रतिक्रिया

सापळ्यामध्ये वाघ सापडे…

सापळ्यामध्ये वाघ सापडे… “सापळ्यामध्ये वाघ सापडे, बायका-मुले मारिती खडे” ही म्हण आपल्याला चांगलीच माहिती आहे. परिस्थितीमुळे असहाय्य झालेल्या किंवा दुर्बल असलेल्या कोणावरही लहान सहन व्यक्तीही कसा डाव साधतात सांगणारी ही म्हण आहे. “हरेल त्याच्या डोक्यावर (ओझ्याचा) हारा” किंवा “धनी दिलगीर … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , | यावर आपले मत नोंदवा

बारशाला गेला आणि बाराव्याला आला

बारशाला गेला आणि बाराव्याला आला कुठलेही काम करण्याला गरजेपेक्षा अधिक वेळ घेणाऱ्या व्यक्तीचा वक्रोक्तीने समाचार घेणाऱ्या अनेक म्हणी सर्वच भारतीय भाषांमध्ये आहेत. शीर्षकात लिहिलेली म्हण हा त्याचाच एक नमुना. “अंगाऱ्याला गेला आणि दिवस करायला आला” अशीही एक म्हण मराठी मध्ये … Continue reading

Posted in भाषा भगिनींची एकात्मता | Tagged , | 2 प्रतिक्रिया