माझा सोनमोहोर
..
चैत्राची माझी आठवण म्हणजे घराजवळ असलेल्या पिवळया फुलांच्या झाडाची आठवण. आमच्या घराच्या दारात एक झाड आहे. चैत्र महिन्याच्या आसपास त्याला पिवळया रंगाची फुले धरतात. देठाच्या बाजूला किंचित तपकिरी होत जाणार्या तीन-चार पाकळयांची फुले दिसायला लागतात आणि काही दिवसांतच हजारो फुलांनी लगडलेले झाड पूर्ण पिवळे होऊन जाते. आकारा-रुपाने ते झाड म्हणजे गुलमोहराचाच जत्रेत हरवलेला भाऊ वाटतो. ह्या झाडाला सोनमोहर म्हणतात हे मला अगदी अलिकडे समजले.
ते झाड आम्हा भावंडांच्या बालपणाचा एक अविभाज्य भाग बनून गेले होते. उन्हाळयाच्या सुटीतील असंख्य उपक्रम ह्या झाडाच्या सहभागाने झाले होते. लपालपी / डबाऐसपैस / भोज्ज्या असल्या खेळात एका भिडूची लपण्याची सोय ह्या झाडाने अनेक वर्षे केली. झाडाच्या दृष्टीने आजही हरकत नसावी, पण आमचे आकार वाढण्याचा वेग व झाडाच्या बुंध्याचा व्यास वाढण्याचा वेग ह्यात थोडी तफावत आहे! अंगणात केलेल्या मातीच्या किल्ल्याच्या सजावटीतील मोठा भार ह्या झाडाच्या फुलांनी उचलला होता. रस्त्यावरील मैलाच्या दगडापासून ते खांब्यावरील दिव्या पर्यंतच्या सर्व भूमिका त्या फुलांनी निमूटपणे निभावल्या. नाचातील राधाकृष्णां च्या गळयात हार पडायचे ते ह्याच फुलांचे. एका सुटीत तर दणक्यात साजरे केलेलेभावला-भावलीचे लग्न ह्याच फुलांच्या भरवशावर पार पडले होते.
त्या फुलांना ना सुगंध, ना लांब सडक डेख. देव पूजे पासून फुलदाणी पर्यंतच्या कुठल्याही मोठयांशी संबंध येणार्या गोष्टीं साठी ते अत्यंत निरुपयोगी. कदाचित त्यामुळेच असेल, पण त्या फुलांवर आम्हा लहानांचा मालकी हक्क स्थापन झाला होता. ते झाड किंवा त्याची ती पिवळी फुले कधी धडा बनून आमच्या अभ्यासात आले नाही. ना त्याचा कधी उभा छेद करायला लागला ना त्याचे परागकण सूक्ष्मदर्शकाखाली बघावे लागले आणि ना कधी त्याची आकृती काढून जरनल नावाची मगजमारी करावी लागली. बहुधा त्यामुळेच त्या झाडांची व फुलांची दोस्ती अगदी पक्की होऊन गेली. संपूर्ण सुटीभर आमच्या धमालीत हे झाड सहभागी होऊन जायचे. म्हणता म्हणता निकालाची वेळ यायची. मग यथातथा मिळालेल्या मार्कांच्या प्रगतीचा दस्तावेज घेऊन काहीसे हिरमुसले होऊन घरी येताना हाच मित्र मना पासून आणि न विसरता आमच्या वर पुष्पवृष्टी करायचा.
दर वर्षी आयुष्यातल्या आणखी एका चैत्राला सामोरे जाताना ह्या सगळया चित्रांचा पट उजळणी केल्या सारखा झर्रकन डोळया समोरून सरकत जातो. वाढत्या वया बरोबर सवड नसण्याची सवय होऊन गेली व निसर्गाचा नित्य आनंद घेण्याचा उत्साहही झाकळला गेला. त्या झाडाशी असलेले नाते आता नाममात्र होऊन गेले. “सिग्नलहून पुढे आलास ना की अर्ध्या मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर एक झाड लागेल त्या मागचेच घर… ” असा कधीतरी नव्याने येणार्याला पत्ता सांगण्यापुरता प्रासंगिक संबंध उरला त्या झाडाशी. …झाड मात्र नित्यनेमाने वार्षिक वसंतोत्सव साजरा करीतच आहे, त्याच पिवळया फुलांची पखरण नव्या काँक्रीटचा रस्त्यावर दर चैत्रात सवयीने करतेच आहे.
.
माझा पाऊस
.
पलीकडे
एल निनो नावाच्या प्रवाहाच्या
अडण्या – वाहण्याचे आडाखे…
अलीकडे
राजकारण्यांच्या कलाकलाने
मान्सूनच्या पु-या-अपु-यापणाचे ठोकताळे
मध्ये सापडलेला बिचारा
माझा साधा भोळा पाऊस
.
घरामध्ये छत्र्या-रेनकोटांचे
आणि पावसाळी चपलांचे विषय
बाहेर चर्चा पैशांच्या
-नालेसफाईत अडवल्याच्या आणि
मिठी नदीच्या कामात जिरवल्याच्या
मध्ये बावचळलेला बावरा
माझा कसाबसा पाऊस
.
हीच वेळ आहे…
कोरडे शहर मागे सोडून
हिरव्या विश्वात जाण्याची
कोसळत्या धारांचा आणि
उगवत्या अंकुरांचा साक्षात
मीलनोत्सव पहाण्याची
.
हे वार्षिक आन्हिक
जर नाही घडले हातून
तर पावसाचे सृजनाशी असलेले नाते
जायचे कायमचे विस्मरणात
आणि उरायचे केवळ
एल निनो, गळक्या गच्चा
आणि भ्रष्टतेचा ’मिठी’ प्रवाह.
हार्दिक अभिनंदन.
खुपच सुन्दर, लेख ही आणि कविता पण.
धन्यवाद. वाचत जा. कळवत जा.
हार्दिक अभिनंदन. आपल्याला बाप जन्मात कुठली कविता समजणे, आवडणे शक्य नाही, या माझ्या अनुभव सिद्ध मताला तुझ्यामुळे धक्का बसला. खरं तर एवढ्यामुळे सुद्धा तुला पारितोषिक द्यायला हरकत नाही.
खूप आनंद झाला तुझी प्रतिक्रिया वाचून. साधारणत: काहीही पाठवले तरी तू कळवतोसच. तुझे ‘पारितोषिक’ ५ जून ला भेटू तेव्हा वसूल करेन!
Dear SharadMani,
Kudos to you on this marvellous achievement! Keep posting and share such news regularly!
Your “Sonmohor” kindled the memories of a giant Tamarind tree that was an unforgettable part of my early life at Gulbarga! Unfortunately, it was felled during my childhood. But the memories remain.
The rain itself will indeed be drowned in mithi like things if we are not observing the things as aptly narrated by you!
thanks prasad. you are right. almost no childhood is without memories related to trees. it was consistent follow up (5 years!) on part of our friend and prof. narendra pathak resulted in this article. he always asked me to write for his chaitreya magazine (spring special no.). the original article is little big. this piece is a art of that article. thanks again.
कविता खूप आवडली … मस्त! आणि आम्हा बहिणींकडून अभिनंदन!
आवर्जून कळवल्या बद्दल धन्यवाद.
sir really ultimate… etka sahaj and etka sundar…wachun fresh watla
अभिनंदन !!!!
मनापासून धन्यवाद…आणि आहेस कुठे?
अभिनंदन!!
तुमच्या कडून अभिनंदन म्हणजे अत्यानंद. मनापासून धन्यवाद. (५ जून ला भेट होईलच!)
अवश्य!! नक्की भेट हॊईलच…
khup chan kharach agdi maan pasun
अगदी मनापासून अभिनंदन !! लेख आत्ताच वाचला. कविता आधी ब्लॉग वर वाचली होती. दोन्ही छान आहेत. सोनमोहराशी निगडीत असलेल्या माझ्याही आठवणी जाग्या झाल्या.
कविता खूप आवडली!
अभिनंदन!!
अभिनंदन … खूपच छान कविता आणि लेख …
Heartly Congratulations, you are also born to make records like Sachin Tendulkar. Keep it up till you don’t satisfy yourself.
Best Regards
Shailesh Shirwadkar
Heartily Congratulation
abhinandan……..!!! Lekh ani kavita donihi mast aahe…..aavadale….
chhan lihile aahe…!! congrats.!!!!
khupch chan vatla vachun, abhinandan
तुझ्या उत्कृष्ट निर्मितीला अधिकृत सन्मान मिळाला याचा खरोखर खूप आनंद झाला. तू लिहीत रहा, हे मी सांगायला नकोच.
vaa ! kavita v lekh aahe !
abhinandan !!!
uttam lekha va kavita
Dear Sharad,
Tuzyatli pratibha parishadechya kama darmyan anekda darshan devun jaychi, pan baryachda ti jara hatke aani khodkar angane asaychi (apvad – Mee ubha Kodgyasarakha, Chatrasalchya Seemevarti). Tyamule asel kadachit pan aamcha Sharadmani Sahityachya Varitla Saraswatichi Pataka dimakhane ghevun pudhe janara “Saraswat” aahe he Samajayla kahi kal java lagla.
Tujhya Lalit Lekhachya aani Kavitechya premat padloy. Khupach Chhan. I am proud of you. Kadhitari bhetun ha lekh aani Kavita sandarbhasahit (asnarach bahudha) tujhya tondun aikav. Vachanyapeksha tujhya tondun aiknyat jast maja yeil. Mangesh
“Sonmohor” touched heart!!!
मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला तुझ्या लेखणीचा लळा तर आहेच, पण आता ‘कोकण’चा वारा
हा सुगंध सर्वत्र घेऊन जाईल आणि तू अधिक वाचला जाशील.
खूप लि’हित’ रहा , त्यात(च) ‘हित’ आहेच.
Congratulations!
Jabardast, as usual. Pls write something about your foreign trip.
mast ….nostalgia jaga zala 🙂 …