पुर्वांचला संबंधी. . .

मुळा-मुठा ते ब्रह्मपुत्रा!

या गोष्टीला दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. मी पहिल्यांदा आसाममध्ये गेलो होतो. प्रा. बिराज चौधरी यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत रात्रीचे भोजन सुरू होते. असमिया भाषा, सण-उत्सव यांची माहिती करून घ्यावी, या हेतूने गप्पा सुरू होत्या. बिराजजीही महाराष्ट/तील तशाच प्रकारच्या गोष्टींबद्दल कुतूहल दाखवीत होते. चौधरीकाकू प्रेमाने वाढत असलेल्या सुग्रास असमिया पदार्थांवर ताव मारीत आमचे गप्पाष्टक रंगले होते.

”बिराजजी, असमिया भाषेत सापाला काय म्हणतात?” मी विचारले.

”सापाला हाप म्हणतात.” बिराजजींनी माहिती पुरवली.

तेवढयात जवळच खेळत असलेला त्यांचा आठेक वर्षांचा मुलगा ॠषी (उच्चारी रिखी!) मोठयाने ‘हाप… हाप’ असे ओरडू लागला. त्याचे ओरडणे ऐकून चौधरीकाकू लगबगीने बाहेर आल्या व छोटया ॠषीला दटावून गप्प केले (आसाममध्येही हे कार्य महिलांनाच करावे लागते!)

”ॠषीच्या आईने त्याला काय सांगितले?” संभाषण न कळल्यामुळे मी बिराजजींना विचारले. ॠषीची आई म्हणाली की रात्रीची वेळ आहे, ‘साप साप’ ओरडू नकोस. मी विचारले की, आक्षेप साप साप ओरडण्याला आहे की रात्री तसे ओरडण्याला आहे? ”रात्री साप साप ओरडण्याला.” बिराजजी पुढे सांगू लागले- ”आमच्याकडे असा संकेत आहे की, रात्र झाल्यानंतर साप साप असे ओरडायचे नाही.”

मला हे ऐकून आश्चर्य वाटले. माझ्या कोकणातल्या एका आजीनेही रात्री साप म्हणण्यावरून दटावलेले मला आठवले. ”असाच संकेत आमच्या कोकणातही आहे.” मी म्हणालो. ”…आणि तरीही रात्री सापाचा उल्लेख करायचाच असेल, तर तर तो अन्य सांकेतिक शब्दांनी करण्याची प्रथा आहे. उदा. ‘लांबडे जनावर’ इ.” मला आठवलेली सर्व माहिती मी उत्साहाने बिराजजींना पुरवत होतो. ‘लांबडे जनावर’ हे शब्द व त्यांचे अर्थ इंग्रजी- हिंदीची कसरत करीत माझ्या परीने त्यांना समजावीत होतो. माझी माहिती ऐकत असतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागले.

माझे बोलणे पुरे होते, तोच बिराजजी म्हणाले, ”आश्चर्य आहे, असमिया भाषेतही सापाचा अवेळी उल्लेख अशाच सांकेतिक शब्दाने केला जातो. शब्द वापरतात दिघलपूर्वा आणि त्याचा अर्थ आहे लांब किंवा मोठे जनावर!”

विविधतेमधील एकता हीच भारताची विशेषता आहे, असे बोलणे मी त्यापूर्वी अनेक भाषणांतून ऐकले असेल. पण त्याचा साक्षात्कार मला जसा त्या असमिया कुटुंबात जेवणाच्या टेबलावर झाला, तशा परिणामकतेने तो कुठल्याही भाषणातून होणे केवळ अशक्य आहे. हीच गोष्ट ओळखून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘आंतरराज्य छात्र जीवन दर्शन’ या उपक्रमाची सुरुवात सुमारे 35 वर्षांपूर्वी केली. ईशान्य भारतातील व उर्वरित भारतातील शेकडो विद्यार्थी-युवकांनी हा एकात्मतेचा प्रत्यय घेतला आहे. परिषदा, परिसंवाद, चर्चासत्रे अशा शासकीय वा तत्सम स्तरावरून राष्ट्रिय एकात्मतेच्या भावनेला वृध्दिंगत करण्याचे वातानुकूलित प्रयत्न होताना दिसतात. पण या प्रकल्पाचा पोत मात्र सर्वस्वी वेगळा आहे. ‘सांस्कृतिक परिचय यात्रा’ हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा उपक्रम असतो. दरवर्षी ईशान्य भारतातील विद्यार्थी-युवकांचा एखादा गट उर्वरित भारतातील राज्यांमध्ये तीन-चार आठवडयांच्या प्रवासासाठी आमंत्रित करायचा, विविध शहरांतील त्यांचे वास्तव्य समवयीन स्थानिक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या घरीच करायचे, त्या त्या शहरातील शिक्षण, समाजकारण, कला, साहित्य आदी क्षेत्रांतील नामवंतांचा सहवास त्यांना घडवायचा, अशी म्हटले तर अगदी साधी कल्पना या यात्रेची असते. अशा यात्रांतून अन्य राज्यांतील विद्यार्थीही ईशान्य भारतात जातात.

अशाच उपक्रमांमधून पूर्वांचलात गेलेल्या मुंबईतील युवकांच्या माध्यमातून आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या प्रकल्पांतर्गत ‘उत्सव पूर्वांचल’ या आगळयावेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये शिकत असलेले पूर्वांचलातील विद्यार्थी व नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने पूर्वांचलातून मुंबईत आलेल्या कुटुंबातील तरुण मंडळी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्वांचलातील लोककला, लोकनृत्य व लोकसंगीताचा एक रंगमंचीय आविष्कार रविवार 20 फेब्रुवारी 2005 रोजी सकाळी 10 वाजता रवींद्र नाटय मंदिर, पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई-25 येथे होणार आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोरम व त्रिपुरा या सात राज्यांतील कलावंत यात सहभागी होणार आहेत. आसामचे बिहू नृत्य, मणिपूरची रासलीला, नागांचे बांबू नृत्य इत्यादी नृत्यप्रकारांच्या बरोबरीने विविध राज्यांतून आलेल्या, अनेक जनजातींचे सुश्राव्य लोकसंगीत, लोकवाद्ये यांचाही परिचय या निमित्ताने मुंबईकरांना होणार आहे.

(प्रथम प्रसिद्धी: लोकसत्ता फेब्रु. २००५)

14 Responses to पुर्वांचला संबंधी. . .

  1. milindarolkar म्हणतो आहे:

    आपली सुप्रसिध्द कविता आजही समर्पक आहे. तिचा अंतर्भाव करावा…

    “मी उभा कोडग्यासारखा, छत्रसालच्या भूमीवर”…

  2. Shireesh Kedare म्हणतो आहे:

    pahile paaul takale. blog pahila.

    Shireesh

  3. SANJAY VAZE म्हणतो आहे:

    “मी उभा कोडग्यासारखा, छत्रसालच्या भूमीवर”… hi kavita milel ka ?

  4. Narendra Godse म्हणतो आहे:

    Sahhi! Chatrasal lavkar taka. amchi kahi madat honar asel tar sanga.

  5. vivek sinare म्हणतो आहे:

    Great to read ! Now we can also enjoy your poems (otherwise pratibheshi amacha jast sangam hot naahi)

  6. prasanna म्हणतो आहे:

    namaste shardmani,
    i came to know about your blog today only.
    i hope to read more from u, but u dont seem continuing?

  7. aparna karmarkar म्हणतो आहे:

    My husband and myself will like to North-East India. Would it be possible to let me know, who can help us for travel planning. Thanks

  8. Devray karambelkar म्हणतो आहे:

    “मी उभा कोडग्यासारखा, छत्रसालच्या भूमीवर”… ही कविता मिळेल का? संपूर्ण वेब वर खूप शोधले. शेवटी तुमचा ब्लॉग पाहिला. आता वाट पाहतो तुमच्या कवितेची. नमस्कार
    देवराय करंबेळकर

    • sharadmani म्हणतो आहे:

      देवराय, धन्यवाद. लवकरच ती कविता टाकणार आहे. तुम्ही पहिले असेल तर ह्या ब्लॉग वर प्रसृत केलेले सर्व साहित्य हल्ली हल्ली लिहिले आहे. त्यामुळे ते सहजपणे ब्लॉग ला लागणाऱ्या युनिकोड प्रकारातच टंकित केलेले असते. जुना मजकूर परत एन्टर करणे अजून सुरु केले नाही. आहेत त्या डेडलाईन, व्यवसाय सांभाळून, सांभाळणेच जेमतेम जमते. असो बाकीचे होईल तेव्हा होईल निदान ही कविता तरी नक्की टाकेन लवकरच. आठवणीने व प्रेमाने कळवलेत…आनंद झाला.

  9. Chandrasingh Patil म्हणतो आहे:

    Awaiting for मी उभा कोडग्यासारखा, छत्रसालच्या भूमीवर”… I heard this poem from Shri. Kailaschandra Avhad long long ago.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s