Category Archives: ललित
आर. के. लक्ष्मण: अल्पाक्षरी अग्रलेखांचा बादशहा
आर.के. लक्ष्मण गेले. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ चाललेले खुसखुशीत, नर्मविनोदी तर कधी सडेतोड असे सचित्र उपहासपर्व संपले. रोज सकाळी टाइम्स उघडताच कधी मथळयावर नजर टाकल्यानंतर, तर कधी त्याहीपूर्वी ‘यू सेड इट’ शीर्षक असलेल्या व्यंगचित्राकडे नजर वळली नाही असे व्हायचे नाही. राजकीय, सामाजिक, प्रशासनसंबंधी अशा अनेक … Continue reading
अकराव्या दिशेची धूळ..
पाश्चात्य शास्त्रज्ञांनी कृष्ण-विवराचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले. आपल्या पासून साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या त्या अद्भुताचे चित्र बघताना अंगावर काटा आला. १९६० च्या दशकाच्या शेवटी चंद्रावर माणसाने ठेवलेले पाऊल असेल, १९७० च्या दशकात भारताने अंतराळात सोडलेला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह … Continue reading
इंग्रजीशी मराठीचे ‘गिव्ह’ आणि ‘टेक’
नुकतेच साहित्य संमेलन पार पडले. मराठी भाषा दिनही साजरा झाला. साहित्य संमेलनासंबंधी प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख इत्यादी वाचताना काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या साहित्य संमेलनाची फार आठवण झाली. माजी पंतप्रधान मा. पी. व्ही. नरसिंहराव त्या संमेलनात पाहुणे म्हणून आले होते. मराठी … Continue reading
आवाजी बिल ते प्रिंट-आउट
. . . . . . . . . . . .. . . . . . नव्याने मुंबईत येणा-या कोणालाही मुंबईचे एक वैशिष्ट्य ठळकपणे जाणवते ते. म्हणजे इथे जाग-जागी असणारी उपहारगृहे. तशी इतर शहरातही खाण्याच्या जागा, रेस्टॉरंट असतातच. पण … Continue reading
पहिला नववर्ष दिन
आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. अनेक जुनेच संकल्प नव्या उत्साहाने पुन्हा करण्याचा दिवस. शालेय वयात असताना रोज दैनंदिनी लिहिण्याचा संकल्प करून एका एक जानेवारीला रात्री पूर्ण दिवसाचा वृत्तांत खुलासेवार लिहिल्याचे मला आठवते आहे. त्या दिवशी मला ते एक पूर्ण पानही … Continue reading
चैत्र चित्रे
मुंबईत चैत्र कधी येतो. धुळवडी नंतर (ज्या धुळवडीला भलेभले मुंबईकर न विसरता रंगपंचमी म्हणतात. पौर्णिमेनंतरच्या लगेचच्याच दिवशी येणारा दिवस पंचमी कसा असेल अशी पुसटशीही शंका त्यांच्या मनात येत नाही. असो!) सुमारे २ आठवडयाने. होळीनंतर काही दिवसातच कोकिळेचे कुहू-कुहू सुरू होते. मी … Continue reading