Category Archives: कविता

यशोदा

Posted in कविता | 7 प्रतिक्रिया

कपापासून कपाकडे

२०१६ च्या होळनिमित्ताने लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील काही विडंबन कविता छापण्यात होत्या. त्यात माझी ही कविताही होती. (मूळ कविता – ‘दातापासून दाताकडे’, कवी- विंदा करंदीकर) कपापासून कपाकडे तुझी माझी धाव आहे कपापासून कपाकडे धुता धुता कपावरील एक कपची उडली होती रंगवलेली … Continue reading

Posted in कविता, विनोदी/ उपरोधिक | 7 प्रतिक्रिया

अटलजी ९०

अटलजी  तुम्हाला सर्वात पहिल्यांदा केव्हा पहिले  ते आज आठवत नाही.  एकदा, माझ्या वृद्ध आजोबांनी  ऋग्वेदातल्या अग्निसूक्तातील  काही ओळींचा अर्थं सांगितला होता समजावून  “अप्रमादयुक्त कवी…  कवीचे चातुर्य आहे ज्याच्या अंगामध्ये  जो आहे सत्याने जाणारा…  सुंदर…उदंड कीर्ति धारण करणारा…  हा धर्मोपदेशक आम्हाप्रत … Continue reading

Posted in कविता | Tagged , , | 79 प्रतिक्रिया

नव्या वर्षा…

. नव्या वर्षा, कसे करू स्वागत तुझे? कशा देउ शुभेच्छा? कशी पाहू आता स्वप्ने अंधारयात्रा संपण्याची? किती पाहायची वाट श्वापदांच्या झुन्डींना अटकाव होण्याची? कसे सांगू तुला जेम तेम जगण्यातले कसे बसे संकल्प? किंवा वाव भर अंगणातले वितभर पराक्रम? …अंगणा बाहेर … Continue reading

Posted in कविता | Tagged , , | 14 प्रतिक्रिया

आसामच्या कविता: २ – ब्रह्मपुत्रा

                  ब्रह्मपुत्रा… सारा आसाम भेदून जाणारे एक खळाळते महाभूत मैलन् मैल पसरलेले महाप्रचंड पात्र ब्रह्मपुत्रा . ऊर्ध्व आसामातील चहामळे शिंपून ती थोडीशी पुढे निघाली आसपासच्या जनाजातीतील तिच्या मैत्रिणींशी खेळत थोडीशी रमली शीतल … Continue reading

Posted in कविता | Tagged , , | 4 प्रतिक्रिया

आसामच्या कविता: १ छत्रसालच्या सीमेवर

. . . . . . . . .अन्यायाच्या विरोधात पेटलेल्या ह्या भूमीवर मी उभा कोडग्यासारखा छत्रसालच्या सीमेवर . दिसते तेवढी शांत नाही ही इथली भातशेती प्रत्येक हिरव्या दाण्यामध्ये दाटून आहे एक भीती परकीयांचे पांढरे पाय उभे पीक तुडवून जातात … Continue reading

Posted in कविता | Tagged , , | 22 प्रतिक्रिया

मेघदूत: उत्तरमेघ

उत्तरमेघ ६ . . . . . गंगेच्या प्रवाहावरून वाहत येणारा शीतल वारा, अन् तीरावरील मंदारवृक्षांची शीतल सुखद सावली, उन निवारलेली सोनेरी वाळू. देवादिकांनी मागणी घातलेल्या सुस्वरूप यक्षकन्या खेळतात येथे गुप्तमण्यांचा खेळ. …वाळूत मूठ खुपसून लपवतात रत्ने, …अन् बाकीच्या शोधतात.

Posted in कविता, मेघदूत | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

मेघदूत: उत्तरमेघ

उत्तरमेघ ५ . . . . . स्फटिकमण्यांनी जडवलेले सौध रात्री फुलतात त्यांवर तारकांच्या प्रतीबिम्बांची फुले. तेथे घुमतो मंद मृदुंग तुझ्यासारखाच गंभीर जातात त्या सौधांवर यक्ष रमणीय कामिनींसह; अन् करतात प्राशन कल्पतरूंच्या रतिफलांची सुमधुर मदिरा.

Posted in कविता, मेघदूत | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

मेघदूत: उत्तरमेघ

उत्तरमेघ ४ . . . . . येथे यक्षांच्या नेत्रातील आसवे असतात केवळ आनंदाची. नसतो ताप त्यांना मदनज्वराशिवाय दुसरा. अन् तोही होतो बरा प्रियजनांच्या मिलनाने. येथे घडतो विरह केवळ प्रणयातील कलहामुळे. अन् नसते दुसरे वय… येथे असते केवळ तारुण्य.

Posted in कविता, मेघदूत | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

मेघदूत: उत्तरमेघ

उत्तरमेघ ३ . . . . येथे दिसेल तुला फुलांनी नित्य बहरलेल्या वृक्षांवर भ्रमरदलाची गजबज. कमळांनी सदैव भरलेल्या ह्या पुष्करिणीवर पाहा हंसाच्या मालिकेचा कंबरपट्टा. हे पिसारा चमकणारे पाळीव मयूर आहेत सिद्ध, माना उंचावून, केकारव करण्यासाठी. मेघा, येथील रात्रीही असतात रम्य. … Continue reading

Posted in कविता, मेघदूत | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा