जागतिक महिला दिन – पुरुषांसाठी काही टिप्स…
.
.
.
.
.
.
.
आठ मार्च हा जागतिक महिला-दिन आहे. साधारणपणे सर्वत्र महिला-सबलीकरणाच्या चर्चा ह्या निमित्ताने ऐकू येतात. ह्या निमित्ताने मी एका दुर्लक्षित विषयावर तुमचे लक्ष वेधू इच्छितो आणि तो म्हणजे पुरुषांनी महिलांकडून शिकण्यासारखे काय काय आहे? ह्या गोष्टींसाठी पुरुषांना दोन मुद्दे मुळात मान्य करावे लागतील.
.
१. आपल्याला शिकण्यासारखे अजून काही शिल्लक आहे. आणि
२. महिलांकडे असे काहीतरी आहे जे आपण शिकायला हवे.
.
मी जेव्हा हे एका विचारवंताच्या आवेशात एका सामाजिक कार्यकर्त्याकडे हा विषय काढला तेव्हा तो खास ‘सामाजिक’ स्मितहास्य करीत म्हणाला…”पुरुषांना हे दोन मुद्दे समजले असते तर महिला-दिन वेगळा पाळायची गरजच उरली नसती” मी त्याची ही प्रतिक्रिया ‘प्रोत्साहन’ मानले आणि काही मुद्दे भराभर लिहून काढले ते तुमच्या साठी शेअर करतो आहे.
.
.
.
.
.
.
.
-
महिलांच्या कडून पुरुषांनी शिकण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा. शेतीप्रधान समाज व्यवस्थेत कधीतरी ‘बाहेरची कामे’ आणि ‘घरातली कामे’ अशी वर्गवारी झाली असावी. शेतीप्रधान अवस्थेतून समाज उद्योगप्रधान अवस्थेत गेला. शहरात आला. यंत्र-तंत्र यांच्यामुळे ‘बाहेरची’ कामे सुकर होत गेली. युनियन-बाजी, कर्मचारी फ्रेंडली धोरणे, ऑटोमेशन, यामुळे ‘बाहेरच्या’ कामांमधले श्रम कमी-कमी होत गेले. पण घरातले श्रम तसेच राहिले आणि महिला ते श्रम करीतच राहिल्या. गॅस स्टोव्ह, मिक्सर, प्रेशर-कुकर सारख्या ‘सोयी’ गृहीत धरल्या तरी महिलांच्या श्रमाची बरोबरी पुरुष करू शकणार नाही. सर्वात पहिली गोष्ट पुरुषाने महिलांकडून शिकली पाहिजे ती म्हणजे शारीरिक श्रमाची तयारी.
-
५० किंवा ६० च्या दशकांत, गिरगावातून फोर्टमधील कार्यालयात कामासाठी नउ च्या सुमारास गेलेला नवरा दिवसभराच्या कामाने ‘दमून’ सहा-साडे सहा वाजता घरी यायचा तेव्हा ‘दमून’ आलेल्या नवऱ्याच्या कलाकलाने घेत त्याचा सगळा तऱ्हेवाईकपणा त्याची पत्नी कर्तव्यभावनेने सहन करायची. पुढे ७० च्या दशकानंतर मोठ्या संख्येने महिला ऑफिसांमध्ये काम करू लागल्या आणि काम करून किती ‘दमायला’ होते त्याचे पुरुषांचे पितळ उघडे पडले. तरीही त्यानंतरच्या महिलांच्या काही पिढ्या घरचे काम, कुळाचार आणि ऑफिस अशा सर्व गोष्टी मोठ्या तडफीने करत राहिल्या आणि पुरुष मात्र अडीअडचणीला ‘बाहेरच्या’ पोळ्या खाव्या लागतात म्हणून कुरकुरत राहिला.
-
पुरुषांनी महिलांकडून शिकण्याची महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे ‘मल्टी-टास्किंग’ अर्थात एका वेळेला अनेक कामे करण्याची कला. सकाळी उठल्यावर शांतपणे चहा पिणे, तयार होणे, नाश्ता करणे आदि ‘कामे’ एका लाईनीत करणाऱ्या पुरुषाने एकदा पोळ्या करणे, भाजी फोडणीस टाकणे, रस्त्यावरून जाणाऱ्या भाजीवाल्याच्या ओरडण्याकडे लक्ष ठेवणे आणि ऑफिसमधून आलेला एखादा फोन अटेंड करणे अशी सगळी कामे घरची बाई एकाच वेळेस कशी करते हे एकदा अवश्य पहावे आणि त्याच्यामधून काही कौशल्ये वेळेवारी आत्मसात करावीत नाहीतर एखादे वेळी अशीच कौशल्ये ऑफिसच्या कामातही दाखवणारी एखादी महिला-सहकारी तुमचे एखादे प्रमोशन घेऊन जायची.
-
भावनिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा महिला अधिक ठाम आणि स्थिर असतात, अर्थात पुरुषांची ह्याच्या एक्झॅक्ट्ली उलट समजूत असते. आकडेवारी असे सांगते की मानसिक दौर्बल्यातून आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचलण्यात पुरुषांचे प्रमाण अधिक असते. बहुधा पुरुष ज्यांना महिलांचा ‘वीकनेस’ समजतात तेच गुण उदा: सहज संवाद साधणे, भावना व्यक्त करणे, हसणे-रडणे ह्यातील सहजता, ह्यामुळे त्या भावनिकदृष्ट्या अधिक खंबीर होत असाव्यात.
-
महिलांना रंगसंगती बद्दलचे उपजत जात असते. पुरुष सरधोपटपणे ‘हिरवा’ म्हणून मोकळा होईल अशा रंगांच्या पोपटी, शेवाळी, मेंदी, ऑलीव्ह ग्रीन अशा कितीतरी छटा महिला सांगू शकतात. आणि जे हिरव्याचे तेच तांबड्याचे आणि निळ्याचे. कुठल्या रंगासोबत दुसरा रंग चांगला दिसेल ह्याचाही सेन्स महिलांचा चांगला असतो. ह्यात पुरुषांना शिकण्यासारखे जरी काही नसले तरी महिलांनी केलेल्या रंगांच्या निवडीला वा रंगसंगतीला ‘आव्हान’ न देणे इतके तरी शहाणपण पुरुष शिकूच शकतो.
-
परस्पर संवाद, घासाघीस (बार्गेन) करणे, दुसऱ्याला समजून घेणे आदि कौशल्यांच्या बाबतीत तर कुणीच हात धरू शकत नाही. त्यांना कमी लेखत ही कौशल्ये वापरण्याची संधी त्यांना मिळाली नाही. निदान आता तरी ह्या विषयात त्यांच्याशी स्पर्धा न करता त्यांच्या ह्या गुणांचा परस्पर पूरक उपयोग कसा करून घेऊ शकतो ह्याचा विचार पुरुषांनी, विशेषतः अधिकारांवर असलेल्या (आणि अधिकार गाजवणाऱ्या) पुरुषांनी करायला हवा.
थोडक्यात सांगायचे तर आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने पुरुषांच्या सबलीकरणासाठी उपयोगी पडणाऱ्या काही टिप्स मी दिल्या आहेत. “आजवर झालं ते झालं” असं म्हणत महिलांना समजण्याची आणि मुख्य म्हणजे महिलांकडून बरेच काही शिकायचं ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिना पेक्षा अधिक चांगला मुहूर्त तो कुठला?
-मणिंदर
(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, मार्च २०१४)
.
congrats , awesome article.. three cheers to womens power..
धन्यवाद प्रज्ञा. त्वरित मिळालेल्या प्रशंसेने आनंद वाटला. हा ब्लॉग सबस्क्राइब कराल तर आपोआप इंटीमेशन मिळेल नवीन लिहिल्याचे.
yes i have subscribed
thanks
खूपच सुंदर लेख…! एखाद्या रत्नपारख्यासारखी तुम्ही स्त्री मधील अनेक महत्वाच्या गुणांची छान पारख केली…! लेख प्रचंड भावला…!
धन्यवाद जी.टी. तुमचा अभिप्राय खूप मोलाचा आहे माझ्यासाठी
Many thanks and whole hearted appreciation. I am so happy to have a friend who thinks like this!! 🙂
धन्यवाद. वाचत राहा.
शरद तुझ्या मुंबईतल्या व्यस्त जिवनातुन ईतके अचुक निरीक्षण अचुक टायमींगसह साधण्याच्या कलेला तोड नाही.आगे बढते रहो.महिला दिनाच्या निमीत्ताने तु व्यक्त केलेली ईछा पुरुषा़क्डुन पुर्ण होवो हीच अपेक्षा. ।ऑवॉ ।ईचा अपॅक्षा.
धन्यवाद सुधीर. आनंद वाटला वाचून. ज्या समतेबद्दल आपण आपल्या formative वयात आग्रहाने बोलत होतो तेच लिहिले आहे. मी शब्द बद्ध केले आपल्या सर्वांच्या वतीने. a kind of स्वयंघोषित ‘प्रवक्ता’!
एक पुरुष महिलांचे इतकया चांगलया प्रकारे निरीषण करुन विशलेषण करु शकतो याचे कौतुक वाटते.
धन्यवाद स्वाती. हा सगळा मी ज्या संस्कारात वाढलो त्याचा स्वाभाविक परिणाम आहे. माझे वेगळे असे काही नाही.
sharad ekdum mast !!!!! Usha is really lucky to have you.!!!!
धन्यवाद स्नेहा. आनंद झाला हे वाचून. तुझा अभिप्राय माझ्यासाठी महत्वाचा आहे.
A very good article. my opinions regarding women are much more similar to you.Infect i am already following some suggestions in practice. My own view is that instead of thinking about women as special case, if we see the women from human point of view all the other scenario will be automatically changed. congrats for writing good article.
Thanks Pankaj.
हा समतोल लेख वाचून फ़ार बरे वाटले . धन्यवाद. महिला हे हमखास विनोदाचे साधन म्हणून पाहणारे लेखक , महिला दिनानिमित्त केलेल्या गूगल डूडलवर असलेली कठपुतली , ह्या सगळ्याने झालेली डोकेदुखी कमी की काय म्हणून महिला दिनानिमित्त होणाऱ्या विचारशून्य पार्टीज …. ह्या सगळ्यालाच छेद देऊन आलेला हा लेख… असे काही वाचले ,पाहीले की विश्वास वाटायला लागतो … स्त्री -पुरुष भेदाच्या पार जाउन माणूसपणापर्यंतचा प्रवास आता जास्त अवघड नाही . मग हा लेख एका माणसाने दुसऱ्या माणसाकडून शिकण्याच्या गुणांचा होईल !
धन्यवाद वृंदा. से शब्द म्हणजे लिहीणाऱ्या साठी ‘टॉनिक’. प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. धन्यवाद …मनापासून…पुन्हा एकदा.
छान….आवड्या. पाहणारे सगळेच असतात, पण सगळ्यांना दिसतंच असं नाही. ते तुम्हाला दिसलं. डोळ्यांत अंजन घातल्याबद्दल समस्त पुरुषांच्या वतीनं आभारी आहोत.
ज्ञानेश्वर, धन्यवाद. लिहिताना ‘अंजन’ वगैरे मूड नव्हता. पण सुमारे चार दशके महिलांच्या निरीक्षणानंतर 😉 जे भावले ते लिहिले!
me jari mahila din ultun gelyavar vachale asla tari khup mast lihila ahe. Agdi chotya goshti khup sahajpane mandlya ahet. Saglyat mhanje tumachya vinodbuddhimule lekh manala jast bhavto. My congratulations..
धन्यवाद डॉ. साधना. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. इंजिनिअर आणि कॉन्ट्रक्टर म्हणून माझा ज्यांच्याशी संबंध येतो त्यातील फार कमी जणांना मी लिहितो हे माहित आहे. एक तर माझे लेखनात प्रसिद्ध होणारे नाव वेगळे असते. आमची शाळा मैत्रीण आता फ्री झाली असेल. संयुक्ता. कधी भेटायचे का तिला?
Mast lihile ahet tumhi!Mahila dinachya nimittane stree-purush samante sarkhya gahan wishaya war anek lekh wachanat yetat pun ugach kichkat ani jad-jad shabda waprun lihilelya lekha peksha hasat-khelat kelele bhashya manala khoop bhawle. Congratulations!
छान लेख, आज माझ्यासकट समस्त महिला वर्गाला आपल्यातल्या सुप्त गुणांची जाणिव झाली असेल. धन्यवाद 🙏
हा हा हा. धन्यवाद वृषाली
खूपच सुंदर
धन्यवाद स्वाती.