येवढेच आठवते मला…

Indira Gandhi

येवढेच आठवते मला…

३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी येवढेच आठवते मला

आठवते…

मन मोहून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वलय

अन् पिढीजात मिळालेला राजबिंडा वारसा

आठवते…

वागण्यात सांभाळलेले एक कमावलेले साधेपण

आठवते…

रेशमी केसांतून डोकावणारी पांढरीशुभ्र बट

आठवते…

पाहताक्षणीच चेहऱ्यावर दिसणारी

लपवता न येणारी

एक प्रचंड महत्वाकांक्षा

.

आठवते…

फिल्म डिव्हिजनच्या

कुठल्यातरी डॉक्युमेंटरी मध्ये पाहिलेली

फुरसतीच्या क्षणी मुला-माणसांत नातवंडात

रमणारी एक लेकुरवाळी आजी

अन् दिवसातले उरलेले सोळा-अठरा तास व्यापणारा

एक असामान्य झंझावात.

.

आठवते…

एका खंडप्राय देशावर, षंढप्राय राजकारण्यांवर

एक-दीड दशक गाजवलेला

एक विलक्षण पुरुषार्थ.

“नष्टासी नष्ट योजावा

हुंब्यासी हुंबा लावून द्यावा”

ह्या दासबोधोक्ती न वाचता देखिल

सही सही व्यवहारात आणणारा

एक लोकविलक्षण मुत्सद्दी.

आयुष्याच्या उत्तरार्धानंतरही

पुत्रवियोगाचा चटका आणि

सत्तेच्या राजकारणातील

लाजीरवाणा पराभव पचवून

उण्यापुऱ्या दोन वर्षांत

फिनिक्स पक्षाप्रमाणे

उभारी घेतलेले एक चैतन्य

अन् पुनर्विजयाच्या दिशेने सुटलेला

एक झंझावाती अश्वमेध.

– – –

कदाचित

३१ ऑक्टोबर नंतर

सवडीने…सावकाश…

सारासार विचार करता…

किंवा कसोट्यांचे दगड लावता…

आठवतील कदाचित

काही वेगळ्या गोष्टी

काही अस्वस्थ करणारे उध्वस्त तपशील

उलट-सुलट विचारांची आवर्तने

कदाचित मनाला

वेगळ्याच निष्कर्षाप्रत नेतील.

तरीदेखील…

३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी

येवढेच आठवते मला

-शरदमणी मराठे

३१ ऑक्टोबर १९८४

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

7 Responses to येवढेच आठवते मला…

 1. धनंजय इंचेकर म्हणतो आहे:

  इंदिरा गांधींना अटलजींनी ” दुर्गा ” म्हटल होत.
  कविता उत्स्फुर्त अाहे , नमस्कार !

 2. Bhagyashri Phanse म्हणतो आहे:

  khup chaan

 3. Yatin म्हणतो आहे:

  Wonderful. Great message. Simple language.

 4. प्रमोद कुलकर्णी म्हणतो आहे:

  पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.. धन्यवाद शरद..!

 5. sneha ketkar म्हणतो आहे:

  Sharad,

  ekdum appropriate kavita !!!!!
  Kharach ya kinwa ashach bhavana hotya tyaweli !!!!!!
  Very apt !!!!!
  Sneha

  Regards,
  Sneha Ketkar
  http://snehaketkar.blogspot.in/

 6. धनञ्जय भिडे म्हणतो आहे:

  आज F B वरील पोस्ट पाहुन कविता पुन्हा वाचली . मी त्यावेळी अमरावती ला ABVP चा पूर्णकालीक होतो . मुतानेजा आडनावाच्या एका शिख परिवाराला मृत्यु च्या दाढेतून वाचवण्या चे पुण्य पदरी आहे . 200 चा वेडा जमाव अंगावर घेण्याचा अगाऊ पणा त्याच वयात शक्य होता . याची देही याची डोळा मृत्यु चा साक्षात्कार त्यावेळी झाला . मंतरलेले दिवस !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s