अटलजी ९०

atalji newspaper

अटलजी

 तुम्हाला सर्वात पहिल्यांदा केव्हा पहिले
 ते आज आठवत नाही.
 एकदा, माझ्या वृद्ध आजोबांनी
 ऋग्वेदातल्या अग्निसूक्तातील
 काही ओळींचा अर्थं सांगितला होता समजावून

 “अप्रमादयुक्त कवी…
 कवीचे चातुर्य आहे ज्याच्या अंगामध्ये
 जो आहे सत्याने जाणारा…
 सुंदर…उदंड कीर्ति धारण करणारा…
 हा धर्मोपदेशक आम्हाप्रत
 सर्वं दैवी शक्तींना घेऊन येवो”

 तेव्हा मात्र मला तुमचीच आठवण आली.
 काल रात्री तुमच्याच कविता वाचत
 खूप उशिरापर्यंत जागलो होतो.
 …तुम्हाला पहिल्यांदा केव्हा पाहिले
ते मात्र आठवत नाही.

atalji bhashan2

 .

.

 एकदा…अंधुकसे आठवते…
 मी अर्ध्या चड्डीवर…
 छातीला ‘दीपकाचा’ बिल्ला लावून पाणी वाटत होतो
 अन् कफ परेड वरून चालला होता तुमचा जयघोष…
 हजारो आत्मविश्वासपूर्ण घोषणा
 एका उघड्या जीपमधून
 तुम्ही मात्र स्थितप्रज्ञासारखे निघून गेलात
 तुमच्या जयघोषाला सहजपणे मागे ठेवून…
 (…आणि हे ही आठवते…
 त्या गडबडीत माझ्या बाबांनी खाऊकरता दिलेले आठ आणे
 पाणी वाटता वाटता माझ्याच उंचीच्या पाण्याच्या पिंपात पडले होते)

 असेच एकदा…
 आणीबाणी मध्ये…एका लेंगावाल्या माणसाला
 आईने दिले होते पदरा मध्ये बांधलेले पन्नास रुपये
 काहीही न बोलता.
 त्याने दिलेल्या पत्रकावर होता
 तुमचाच एक दिलखुलास फोटो.
 तेच जीपवरल्या सारखे मंद हास्य.
 मला तो फोटो हवा होता वहीवर चिकटवण्यासाठी.
 आईने लगबगीने ओढून घेतले ते पत्रक
 अन् पाणी तापवण्याच्या बंबात टाकून दिले…

आणि ही गोष्ट मात्र तशी माझ्या तरुणपणीची.
मी कॉलेजमध्ये होतो.
क्रिकेट टेस्ट सुरू नव्हती;
तरी होता आमच्या हातात ट्रान्झीस्टर
अन् ऐकत होतो रात्रभर जागून निवडणुकांचे निकाल.
जेव्हा प्रचंड मतांनी तुम्ही जिंकल्याचे कळले तेव्हा
सर्वांना कटिंग चहा पाजला होता स्टेशनवर.
दुसऱ्याच दिवशी तुमचा फोटो होता पेपरमध्ये
पुन्हा तेच हास्य…
atalji kavyavachan
त्यानंतरची
 आठवते आहे तुमची प्रत्येक जाहीर सभा.
 ज्यामधून तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने ओतायचात
 समोरच्या श्रोत्यांमध्ये एक दैवी चैतन्य…
 हशा…टाळ्या…हे तर अगदी हुकमी…
 …कधीकधी कातरही व्हायचा तुमचा हळवा स्वर.
 अन् व्याकूळ व्हायचात सभोवतालच्या गंभीर स्थितीने.

 आठवते
 सागरकिनारी…विशाल जनसागरापुढे
 तुमचे प्रभावी…प्रवाही काव्यवाचन
‘ हिंदू तनमन’…किंवा ‘हृदय चाहिये’च्या शब्द लहरींना पाहून
 सागरही अवाक व्हायचा तेव्हा
 अंगावर उभा राहिलेला काटा आजही आठवतोय.
.
.
.

atalji with pet
 अटलजी,
 तुमची प्रत्येक आठवण शीतल झुळूक वाटते शरदातली
 तुम्ही मिळवली एक नि:संदिग्ध लोकप्रियता
 पण त्याकरिता नाही घेतल्यात चुकूनही
 जाती-पातीच्या कुबड्या…
 किंवा भाषांच्या प्रेमा-द्वेषाचे पांगुळगाडे
 नाही कधी केल्यात जाहीर चित्र-विचित्र मर्कटचेष्टा
 नाही केली कधी भारतयात्रा…लॉंगमार्च…
 असल्या बेगडात गुंडाळलेली आडमाप तंगडतोड.
 तरिही जमवलात तुमच्या आठवणीने हुरळून जाणारा…
 प्रेरित होणारा…सद्गदित होणारा…
 मनमोकळा हसणारा…डोळे पानावणारा…
 अन् ‘साला अटलजीका जवाब नही’ असे म्हणणारा…
 उदंड लोकसंग्रह.
 राजकारणात पूर्ण बुडूनही
 कसे राहिलात कमलपत्रागत नामानिराळे
 ह्या राजनीतीच्या जंगलात तुमच्या काळजाचा
 प्रत्येक ठोका अजून जिवंत आहे ह्याचे आश्चर्य वाटते.
 कसे मिळवले लोकांचे प्रेम असे हजारोंच्या हिशेबात?
 …भारतीय राजकारण्यांना हसणाऱ्यांचा…मुरकणाऱ्यांचा…
 टाळ्या हाणणाऱ्यांचा…नाही पडला कधी तुटवडा.
 पण आत्यंतिक प्रेमापोटी तुमच्यावर हक्काने रागावणारा
 गोतावळा तुम्हाला लाभला हे तुमचे भाग्य…अन् आमचेही.

atalji nisargat आठवते…
 “काही म्हणा पण अटलजींचे हे चुकलेच…”
 किंवा
 “आता काही सुद्धा बोलू नकोस बीजेपी बद्दल…”
 असे वेळी-अवेळी म्हणणाऱ्या
 सत्तरीच्या आजोबांना विचारले होते मी एकदा
 “आजोबा, एवढे कावता…त्रागा करता…
 …अविश्वासही दाखवता कधीमधी
 पण दर निवडणुकीला श्रद्धेने जायचात
 आणि उठवायचात शिक्का दिपकावर
 …अन् आता कमळावर……हे असे कसे?”
तेव्हा गळा दाटून आला त्यांचा
अन् मोतीबिंदू झालेल्या डोळ्यात तरळली
आणखी दोन मोत्ये…
ती टिपत म्हणाले आजोबा एवढेच…
“अरे पोटचा गोळा आहे काही झाले तरी…”

atalji talwar अटलजी
 हळूहळू लोकांना कळू लागल्या
 राजबिंड्या राजपुरुषांच्या आणि राजकुलांच्या मर्यादा…
 हळूहळू समजत गेले आहे आपले भलेबुरे लोकांना.
 ठिकठिकाणच्या निराशा आणि असहाय्यता
 उभी करीत आहेत मोठी मोठी प्रश्नचिन्हे.
 अचानक लुप्त झालेल्या विकास प्रवाहांच्या बाबत
 लोक नशिबाला सोडून निवडून आलेल्यांना विचारत आहेत जाब.
 ह्या बदलत्या वास्तवात
 दीनदयाळांच्या प्रेरणा अंगी बाळगणारा
 तुमचा हा गोतावळा.
 क्रमाक्रमाने होणार आहे यशस्वी

याबद्दल पुसटही शंका नाही माझ्या मनात.
मात्र तोपर्यंत
निर्भीडपणे उभे ठाकण्याची शक्ती आम्हास मिळो.
हीच प्रार्थना ईश्वरचरणी
तुमच्या नव्वदाव्या जन्मदिवसा निमित्ताने.

-शरदमणी मराठे 
sharadmani@gmail.com

This entry was posted in कविता and tagged , , . Bookmark the permalink.

79 Responses to अटलजी ९०

 1. Milind Mohan Arolkar म्हणतो आहे:

  केवळ अप्रतिम !

 2. Vinay Sahasrabuddhe म्हणतो आहे:

  Great! As usual, Sharadmabi….

  • sharadmani म्हणतो आहे:

   धन्यवाद विनयजी. तुमची शाबासकी मला बहुमोल आहे. वेळात वेळ काढून वाचल्याबद्दल आणि आवर्जून कळवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

 3. Shailesh D. Shirwadkar म्हणतो आहे:

  Khupach Sundar, Outstanding.

 4. manisha raul म्हणतो आहे:

  khup sundar..

 5. अतूल पाटणकर म्हणतो आहे:

  वा, मस्त. एकदम ‘आपली’ वाटणारी कविता.

 6. anil म्हणतो आहे:

  Surekh ani Bhavapoorna. Anek manatil bhavananche prakatikaran.

 7. narendra sawaikar म्हणतो आहे:

  sundar

 8. विद्याधर कुलकर्णी म्हणतो आहे:

  अतिशय सुंदर व्यक्तिमत्वावर अतिशय सुंदर शब्दात भावनांजली

 9. savitarima म्हणतो आहे:

  टीव्ही वरच्या टिपिकल कव्हरेज पेक्षा अटलजीन्बद्दल व्यक्ति म्हणून काहीतरी सांगणारी कविता आवडली.

 10. Sonawane, Yatin म्हणतो आहे:

  Dear Sharad,

  Very nice article. You have nice way to draft the sentences and good choice of words. Creates good impact.

  Thanks and regards,
  _______________________________________________________________________
  [Email_CBE.gif]Yatin Sonawane
  _________________________

 11. sanjay kirtane म्हणतो आहे:

  निर्भीडपणे उभे ठाकण्याची शक्ती आम्हास मिळो.
  हीच प्रार्थना ईश्वरचरणी ………अप्रतिम ! कविता आवडली

 12. Sneha Ketkar म्हणतो आहे:

  Sharad, Too good !!!! Mast, Mast, Agadi mast !!!!!!!!!!  Regards, Sneha Ketkar http://snehaketkar.blogspot.in/

 13. Vijayalaxmi shinde म्हणतो आहे:

  Chhan

 14. prasad deodhar म्हणतो आहे:

  WACHALI SAMAJALI UMEGEL KA? PRASAD DEODHAR.

 15. किर्तीकुमार बलकी म्हणतो आहे:

  व्वा

 16. mukund tanksale म्हणतो आहे:

  chhanch

 17. Madhav Bhokarikar म्हणतो आहे:

  What can I say about ‘Bharat Ratna Hon. Atal Bihari Vajpeyyeji’?

 18. bhaskar sathe म्हणतो आहे:

  EK APRATIM – MEMORY VERBATIM !!!!!

 19. Shrikant Vasant Marathe म्हणतो आहे:

  Ek Utkrushta Kavita… Shabda – va – Bhavanechya vahanane bhutkaLat nelet. Dhanyavad…
  उत्कृष्ट कविता…. शब्द व भावनेच्या वाहनाने भूतकाळात नेलेत ..व भूतकाळ वर्तमानात आणलात…धन्यवाद ….

  • sharadmani म्हणतो आहे:

   श्रीकांत जी, मनापासून धन्यवाद. जे ७५ – ७७ मध्ये तरुण होते अशा सर्वांच्या वतीनेच हे लिहिल्यासारखे आहे.

 20. NARENDRA PATHAK म्हणतो आहे:

  DEAR SHARAD…ATALJI POEM KHUP SUNDAR…..AAPLYA PIDHICHE MANOGAT…..AAADARSHACHI UJALANI….

 21. MAHESH NATU म्हणतो आहे:

  HEART TOUCHING KA KAI ASA MHANTAT TASCHA AAHE BHAU

 22. MAHESH NATU म्हणतो आहे:

  ME NAHI SHABDAPRABHU PAN WATLA TASCH LILHILA

 23. Vrunda Tilak म्हणतो आहे:

  कितीदाही वाचली तरी दर वेळी नव्याने आवडणारी.

 24. विश्वनाथ सुतार. म्हणतो आहे:

  आमच्याच भावना यातून व्यक्त झाल्या आहेत. अतीशय सुंदर !

 25. सतीश दत्तात्रेय जोशी म्हणतो आहे:

  वा!!
  शरदमनिजी अप्रतिम!
  कमीतकमी शब्दात सुंदर विचार!!

 26. Seema Kamble म्हणतो आहे:

  Apratim kavita Sharadmani !!!!!

 27. chaitanya jadhav म्हणतो आहे:

  good1.

 28. प्रमोद वसंत बापट म्हणतो आहे:

  शरदमणी, लक्षावधींच्या मनात तरळणारी…स्थिरावलेली रूपं एकाच शब्दरेषेत एका विशाल चित्रासारखी मांडलीस…
  ललितरम्य….आत्मियतापूर्ण…!!
  हे अर्थात नित्याचंच…
  वाचून आमच्या मनातील रूपांचीही चैतन्याने लसलसणारी रेषा आकाराला आली.

 29. Somesh Dahiwal म्हणतो आहे:

  दादा खुप छान

 30. Anil Gajbhiye म्हणतो आहे:

  फार छान काव्यात्मक आदरांजली. मणी जी आपण कवी आहात हे आताच कळलं.

 31. Somesh dahiwal म्हणतो आहे:

  दादा खरंच की काय आपण एवढे भाग्यवान आहोतकी काय आज अटलजींची झालेली भेट डोळ्यासमोरून जात नाही आज मी एक दोनवेळानाहीतर चक्क आठ वेळेस दर्शनघेतले

 32. mahesh म्हणतो आहे:

  सुरेख​…छानच मांडलंय! त्यांचा मोठेपणा हा अनेकांच्या जडणघडणीशी जुळलेला आहे!!!

 33. ujoshi67 म्हणतो आहे:

  किती अप्रतिम लिहिलं आहेस शरदमणी.

 34. Nilesh madane म्हणतो आहे:

  Very touching. ….incisive

 35. Santosh Salunkhe म्हणतो आहे:

  मेरा देश बदल रहा है असं म्हणताना हळुवार पणे अटलजीच समोर येतात. खूप मनस्पर्शी भाव नितांत प्रेम व आदर व्यक्त होतो आहे. शरदजी धन्यवाद

 36. Kedar Deshpande म्हणतो आहे:

  दादा खूप छान कविता। आमच्या सर्वांच्या भावना व्यक्त झाल्यात आणि सगळे फोटो खूपच छान आहेत

 37. मिलिंद देसाई म्हणतो आहे:

  वाह शरडमणी सुंदर, जनमानसातील सार्वत्रिक भावना तू शब्दरूप केलीस

 38. प्रा.सुधीर मुंज म्हणतो आहे:

  भाजपा च्या नव्या वाटचालित अटलजीचा सक्रिय सहभाग नसने जुन्या कार्यक्रत्याना वेदनादायी आहे .नेमका तोच धागा या कवितेत शब्दाशब्दात जाणवतो.

 39. राजेंद्र निकुंभ म्हणतो आहे:

  खुपच सुंदर

 40. Nikhil म्हणतो आहे:

  फार सुंदर, भावनांनी ओतप्रोत। अटलजी आहेतच असे। एकाच वेळी तीक्ष्ण बुद्धी, आक्रमक प्रेम आणि प्रामाणिक भावाभिव्यक्ती यांचा दुर्मीळ संगम।

 41. Ajit Bhagwat म्हणतो आहे:

  Atishay sundar!

 42. चैतन्य पाटील म्हणतो आहे:

  अटलजींच्या व्यक्तिमत्वाइतकीच प्रामाणिकता तुमच्या शब्दात आहे. अफलातून!

 43. शैलजा.शेवडे. म्हणतो आहे:

  डोळ्यात.खरोखर.पाणी.आलं…!.किती.सुंदर.लिहिलं.आहे….!

  • sharadmani म्हणतो आहे:

   धन्यवाद. तुमचे प्रशस्तीपर शब्द माझ्यासाठी महत्वाचे आहेत. हो. मी लिहून स्वत: वाचली तेव्हाही माझे डोळे पाणावले. विशेषत: “पोटचा गोळा आहे…” हा भाग वाचताना. पुन्हा एकदा धन्यवाद.

  • sharadmani म्हणतो आहे:

   धन्यवाद. लिहिणाऱ्या साठी अशी प्रशस्ती म्हणजे tonic!

 44. Girish A Kunte म्हणतो आहे:

  Speechless….no words

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s