सचिन – धडयातला, परीक्षेतला

सचिन – धडयातला, परीक्षेतला

RTW logo.

.

.

.

.

.

चिनच्या निवृत्तीनंतर लगेचच त्याला ‘भारतरत्न’ जाहीर झाले आणि देशभर आनंदाचा एकाच जल्लोश उडाला. स्वाभाविकच आहे. अनेक जण आनंद साजरा करीत आहेत. दैनिके, नियतकालिके सचिनच्या फोटोंनी भरून वाहत आहेत. त्याच्या आप्तस्वकीयांच्या आठवणी छापत आहेत. महाराष्ट्र सरकारला आनंद झालाच असणार, पण शासकीय आनंदाचे ‘जरा वेगळेच’ असते. तो ना ‘झाल्याचे’ कळते, ना ‘साजरा झाल्याचे’. असे ऐकतो की सचिनचा गौरव करण्यासाठी त्याला द्यायचे स्मृतिचिन्ह अजून तयार व्हायचे आहे. मग सध्या सुरू असलेल्या उत्सवात ‘सरकार’ सामील आहे, हे दिसणार कसे? बहुधा स्मृतिचिन्ह येईपर्यंत, आनंदातील ‘प्रेझेन्स’ रेकॉर्ड करण्यासाठी संबंधित खात्याने एक घोषणा करून टाकली की आता सचिनवर पाठयपुस्तकात एक धडा येणार.
.
Sachin-Maninderज्या प्रकारे पाठयपुस्तक काढले जाते, ते लक्षात घेता आणि एक विद्यार्थी म्हणून व नंतर पालक म्हणून माझा पाठयपुस्तकाशी आलेला चार दशकांचा संबंध बघता ह्यामध्ये सचिनचा ‘गौरव’ कितपत होईल, ह्याविषयी मला दाट शंका आहे. जे खाते भारताच्या नकाशामध्येही गडबड करू शकते, ते ‘भारतरत्न’च्या बाबतीत काळजी घेईलच ह्याची अजिबात शाश्वती नाही. त्यामुळे ‘माय लर्नेड फ्रेंड’ असे एक वकील दुसऱ्या वकिलाबद्दल जितपत ‘गौरवा’ने म्हणत असेल, तितपत गौरवदेखील ह्या उपद्व्यापाने साधला जाईल की नाही, ह्याबद्दल माझ्या मनात काळजी आहे. मी केलेल्या ‘पांढऱ्यावरच्या काळयाला’ पाठयपुस्तकात धडारूपी सद्गती आजवर मिळालेली नसल्यामुळे धडा नेमका कसा असेल हे सांगणे कठीण आहे; पण परीक्षेचा (क्वचित पुन:परीक्षेचाही!) उदंड अनुभव गाठीशी असल्यामुळे ‘प्रश्नपत्रिकेत’ सचिन कसा आकारेल, ह्याची मात्र मी निश्चितपणे कल्पना करू शकतो.
.

वस्तुनिष्ठ प्रश्न – जोडया लावा  (एकूण चार गुण)

1. सचिन तेंडुलकर    गोपीचंद सर

2. सायना नेहवाल       कबड्डी

3.  शरद पवार       आचरेकर सर

4. बुवा साळवी   बी.सी.सी.आय.
.

वस्तुनिष्ठ प्रश्न – एका वाक्यात उत्तरे द्या (प्रत्येकी 1 गुण)

1. सचिन कुठल्या क्रीडाप्रकारात पारंगत होता?

2. ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ क्रिकेटला हे नाव कशामुळे मिळाले?

3. क्रिकेटची धावपट्टी किती मीटर लांब असते?

(पुस्तक निघाल्यानंतर, दिवाळीच्या सुटीच्या सुमारास प्रसिध्द केलेल्या शुध्दिपत्रात शेवटच्या प्रश्नातील ‘धावपट्टी’ऐवजी ‘खेळपट्टी’ आणि ‘मीटर’ऐवजी ‘यार्ड’ अशी दुरुस्ती समाविष्ट करण्यात आली होती. तोपर्यंत एक परीक्षा झाली. त्यात ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न ‘ऍटेम्प्ट’ केला, त्या सर्वांना त्या प्रश्नाचे सर्व गुण देण्यात आले. शिवाय एका हुशार विद्यार्थ्याच्या वकील पालकाने परीक्षा मंडळाला कोर्टात खेचले ते वेगळेच. त्याच्या हुशार मुलाने 22 यार्डाचे मीटरमध्ये रूपांतर करून चार दशांश स्थानांपर्यंत अचूक उत्तर काढून लिहिले. पण भाषेच्या शिक्षकाला ह्यातील काहीच न कळल्यामुळे त्याने गुण दिले नाहीत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे भाषा शिक्षकाच्या क्षमतेच्या विषयांत अधिक लिहिणे योग्य नाही!)
.

दीर्घोत्तरी प्रश्न (गुण १०, कुठलेही एक)

निबंध – सचिनच्या बॅटचे आत्मवृत्त

पत्रलेखन – शाळेच्या संघातर्फे शहराबाहेर खेळायला गेल्यानंतर तिथून पालकांना लिहिलेले पत्र

नाटयछटा – मी वानखेडे स्टेडियम बोलतोय…
.

उपक्रम

1. कसोटी संघात खेळलेल्या, तीन अक्षरी नाव असलेल्या (जसे सचिन) मुंबईतील खेळाडूंची सूची बनवा.

2. आडनावात ‘कर’ असलेल्या (जसे तेंडुलकर) क्रिकेटपटूंची यादी करून त्यातून परिपूर्ण संघ बनवा (बारावा खेळाडू आणि किमान एका पंच यांसह).

3. भारतीय क्रिकेट संघातील मुस्लीम खेळाडू आणि सर्वधर्मसमभाव ह्या विषयावर चर्चासत्र चालवा.
.
असे म्हणतात की ज्या एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत सचिन अनुत्तीर्ण झाला, त्या बोर्डाची गुणपत्रिका त्याने रागावून फाडून टाकली होती. त्या वेळी तो नुकताच खेळू लागला होता आणि ‘लेट टीन्स’मध्ये होता, त्यामुळे ह्या प्रकरणाचा फारसा गाजावाजा झाला नाही. पण आज सचिन चाळिशीचा आहे, क्रिकेटमध्ये विश्वविजय करून निवृत्त झाला आहे आणि आता तर ‘भारतरत्न’ आहे. असला एखादा अचाट धडा आणि त्यावर काढलेले अफलातून प्रश्न वाचून पुन्हा एकदा तसेच करण्याची वेळ त्याच्यावर पाठयपुस्तक मंडळाने आणू नये, असे वाटते.
.
जो सचिन गप्पांत, दंतकथांत आणि भावविश्वात आहे, त्याला तिथून उचकटून त्याचा ‘अभ्यास’ करू नका. अन्यथा त्याच्या धडयाबरोबर त्याच्यामधल्या चिकाटी, सातत्य, नम्रता आदी गुणांना तरुणांनी आत्मसात करण्याची शक्यताही ‘ऑप्शन’ला पडायची!

 (प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, ८ डिसेंबर २०१३)

 

 

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

10 Responses to सचिन – धडयातला, परीक्षेतला

 1. Manjiri म्हणतो आहे:

  Fantastic!! very true…

 2. Nivedita म्हणतो आहे:

  ha ha ha chan !sagle khadde adhich distat bare tula…

 3. chandrakantwaghmare म्हणतो आहे:

  mast

 4. priti म्हणतो आहे:

  mastach…….sir …

 5. Chandu म्हणतो आहे:

  Very true. By the way, do you think that Sachin deserved Bharat Ratna so quickly after he retired? I tend to think that Indian Government could have certainaly waited a few years (if not decades) to honor him. I would have liked Dhyan Chand to get that honor.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s