राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१

इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१

RTW logo

डॉक्टर देवी हे भारतीय भाषांचे विशेषतः बोलीभाषांचे चांगले ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासावर आधारित काही बातम्या महाराष्ट्रातील वृत्तपत्रात नुकत्याच आल्या आहेत. काही बोलीभाषा ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या बददल विस्ताराने त्या बातम्यांत छापून आले आहे. महाराष्ट्रात इंग्रजीचा वापर इंग्रजांच्या इतकाच जुना आहे. इंग्रजी वृत्तपत्र आहेत, शाळा-कॉलेज-विद्यापीठात इंग्रजी शिकण्याची व इंग्रजीमधून शिकण्याची सोय आहे. पण तरीही तशी फारशी लिहिली न जाणारी आणि बोलीभाषे प्रमाणे बोलली जाणारी एक ‘इंग्रजी’ महाराष्ट्राने सांभाळली आहे. काळाच्या ओघात ती इंग्रजीही नामशेष होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याचे ‘संज्ञापन’ (म्हणजे सोप्या भाषेत डॉक्युमेंटेशन) करण्याचा हा एक प्रयत्न. हा सगळा प्रयत्न मी महाराष्ट्रात खेडोपाडी पसरलेल्या, इंग्रजी शिक्षण न घेतलेल्या ग्रामीण जनतेला समर्पित करीत आहे…कारण ती जनताच ह्या ‘बोली’ इंग्रजीची जननी आहे.

.

पास आणि नापास – महाराष्ट्रात रूढ झालेले हे शब्द आहेत. त्यांचे इंग्रजीशी असणारे जीवशास्त्रीय संबंध खुलासा केल्या खेरीज कळणार नाहीत इतके हे शब्द महाराष्ट्राने आत्मसात केले आहेत. त्यातील ‘पास’ हा शब्द ‘उत्तीर्ण’ ह्या अर्थाने इंग्रजीत वापरला जातो. मराठीतही तो तसाच वापरला जातो. गम्मत म्हणजे. एखादा पोरगा उत्तीर्ण झाला म्हणजे नेमके काय झाले हे अनेकांना समजणार नाही पण पास झाला म्हणताच पूर्ण प्रकाश पडणारा ‘पास’ हा शब्द आहे. त्याला ‘ना’ हा उपसर्ग जोडून केलेला नापास तर खास मराठीची इंग्रजीला देणगी आहे. त्यातील ‘ना’ मुळे हा ‘पास’ चा विरुद्ध अर्थी शब्द आहे (जसे सुपीक नापीक किंवा मर्द – नामर्द!) हे झटकन समजते. त्यासाठी इंग्रजीचे औपचारिक शिक्षण असण्याची जरुरी नाही.

.
Engraji_Maharashtra
जंक्शन
– हा शब्द थोडा वेगळ्या ‘अंगाने’ जाणारा आहे. मराठी ‘पास’ आणि इंग्रजी ‘पास’ एकाच अर्थाने वापरतात तसे ह्याचे नाही. नाही म्हणायला ‘भुसावळ’ ‘मिरज’ वगैरे रेल्वे जंक्शन आहेत आणि त्यांचे उल्लेखही बोलताना होतात. पण जंक्शन शब्द कायम त्याच अर्थाने वापरला जात नाही. बोलीभाषेतील इंग्रजीत ;जंक्शन’ हे विशेषण आहे. असे विशेषण जे एखाद्या निवडणूक सभे पासून ते विवाह सोहळ्या पर्यंत आणि एखाद्या लावणी पासून ते लावणी म्हणणारी पर्यंत कोणाही बददल वापरले जाते. ‘बजाबा जाधवाच्या पोराचे लग्न एकदम ‘जंक्शन’ झालं’ किंवा ‘अमका तमक्याची तमाशा बारी म्हणजे जंक्शन बगा’ असा उल्लेख ह्या शब्दाचा केला जातो.

.
टीन-पाट – ह्यातील पाट वरकरणी मराठी ‘पाट’ वाटला (कुठलाही… बसायचा पाट किंवा पाण्याचा पाट) तरी इंग्रजी पॉट चा हा मराठी अवतार आहे हे जाणकारांना लक्षात येईलच. पहिला ‘टीन’ हा इंग्रजी टीन ह्या धातूचे नाव आहे. साधारण जंक्शन चा विरुद्ध अर्थी टीन-पाट हा शब्द वापरला जातो. जोरदार पोवाडा जर ‘जंक्शन’ असेल तर मिळमिळीत पोवाडा ‘टीन-पाट’ ठरतो.

.
डॉलर – जगाच्या पाठीवर ह्याचा अर्थ काय आहे हे सांगायची गरज नाही. अमेरिकेचे चलन असलेला डॉलर अख्ख्या जगाच्या आर्थिक प्रगतीचा पासवर्ड झाला आहे. पण महाराष्ट्रातील इंग्रजीला त्याच्याशी काय देणे-घेणे? महाराष्ट्रात ‘डॉलर’ चा अर्थ ‘आण्या’ मध्ये सांगता येईल अशी क्षुल्लक किंमत नसलेले नाणे. उदा: रुपया, पाच रुपये वा दहा रुपयाचे नाणे. उदा: सहा रुपयाचा बिस्कीट पुडा घेतला आणि वीसची नोट दिली की समोरून प्रश्न येतो. तुम्ही रुपयाचा ‘डॉलर’ द्या मी पंधरा रुपये देतो! किंवा शाळेत जाणाऱ्या मुलीला आई विचारते “बरोबर पैसे आहेत ना?” उत्तर येते “हो आई, पाचाचे दोन डॉलर आहेत.

.
लाईट – मूळ इंग्रजीमध्ये लाईट चे अनेक अर्थ आहेत पण त्याच्याशी आमचे फारसे देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील बोलीभाषेत लाईट चा अर्थ ‘वीज’ असा आहे. “काय रे मध्या, पंप नाही लावलास?” “काय करणार सकाळ पासून लाईटच नाही!” असे संवाद ह्या बोलीभाषेत सहज कानावर पडतात. शनिवारी लाईट नसते. मे महिन्यात आठाठ तास लाईट गायब असते. वगैरे…

.
महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षणाच्या वाढत्या शाळांच्या आणि ह्या इंग्रजी बोलीभाषेच्या प्रसाराशी काहीही संबंध नाही. अगदी खरे सांगायचे तर कुठल्याच शाळा निघण्याच्या वा बंद होण्याच्या घटनांशी ह्या बोलीभाषेचा संबंध नाही. फार वर्षांपूर्वी इंग्रजांशी आणि इंग्रजीशी संबंध आलेल्या काही माणसांच्या बोलण्या – वागण्यातून काही शब्द स्थानिकांनी का उचलले, कसे ‘पाळले’, कधी आत्मसात केले आणि फोन, इंटरनेट, वाहिन्या आणि टीव्ही नसलेल्या काळात शेकडो मैल उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रात कसे संक्रमित झाले ह्या थक्क करणारया इतिहासाचा कोणी तरी शोध घ्यायला हवा.
.

– मणिंदर

(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, ०६ ऑक्टोबर २०१३)

 

This entry was posted in Uncategorized and tagged , , , , . Bookmark the permalink.

17 Responses to राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१

  1. maruti shelke म्हणतो आहे:

    टीन-पाट teen pat mhanje tamrel sndasla (toilet) jatana pani nenyacha dabba mhanun vaparla janara shabda ahe ha mhanun itar thikani teen pat kami mahatvacha ashya arthane ha shabda vapartat.

    • sharadmani म्हणतो आहे:

      बरोबर आहे. पण तो शब्द बोलीभाषेत इतका रुजला आहे की त्या शब्दाचा उगम इंग्रजीत आहे हे लक्षातच येत नाही. पुढल्याही भागात असे काही शब्द वाचायला मिळतील. आवर्जून कळवल्या बद्दल धन्यवाद..

  2. Swati C Naik म्हणतो आहे:

    Full 2 dhamal. You know na, mala Kay mhanayche te?

  3. Swati C Naik म्हणतो आहे:

    Good one means? In marathi

  4. Prashant V Pathak म्हणतो आहे:

    Excellent Sharad….. ekdam Desperately vaat baghto ahe ajun shabda janun ghenyachi
    Colloquial bhasha hi anek bhashencha uttam Sangam ahe…example
    Itwar subhaila 8 chya timala Liet geli ti nightla ratri 10 la ali…

    • sharadmani म्हणतो आहे:

      हा हा हा. ह्या सर्वा मागची एक गंभीर गोष्ट अशी की आधी भाषा घडते आणि मग तिचं व्याकरण लिहिलं जातं. (आपल्या लहानपणी इंग्रजी वा संस्कृत शिकताना आपल्याला आधी व्याकरण शिकवलं जायचं; पुढे पुढे शिक्षण तज्ञांनी ते बदलले.) इंग्रजीत dh वरून सुरु होणारे सर्वच शब्द परदेशी आहेत आणि त्यातील काही भारतीय ही आहेत. आता त्यांना डिक्शनरीत आणि व्याकरणात स्थान मिळाले आहे.

  5. milind म्हणतो आहे:

    ek namra puravNi joDu ichhito: amchya gaavache ya ingrajit khooop mothe yogdaan ahe. Amchyakade ‘Daru pine’ yaala ‘charging taakne’ asa shabd aahe.

    • sharadmani म्हणतो आहे:

      भले शाबास. ही अगदीच नवीन addition दिसतेय. मी तर ऐकूनच ‘चार्ज’ झालो. हा हा हा. btw तू दिलेला मुख्य पेपर, पुरवणी, पुरवणी बांधायचा टॉइन चा धागा आदि सर्व ‘नम्र’ असणारच…वेगळे सांगायची गरजच नाही!

  6. Swapna म्हणतो आहे:

    हाहाहा…’लाईट’ शब्द मी अजूनही वापरते… मला आठवणारे काही शब्द –
    ‘गैस’ नोंदव (For booking ‘Cylinder’)
    ‘फोन’ आल्ता का (To ask whether you received ‘Call’)
    ‘पिक्चर’ ला जाऊया (To say, lets go for movie) 😛

    • sharadmani म्हणतो आहे:

      खरं आहे. इंधन वायूची बाटली नोंदवायची आहे असे काही म्हटले तर कळणार आहे का कुणाला? आणखी एक ‘बाटली’ देखील bottle चेच मराठी ‘वेषांतर’ आहे!

  7. हर्षद कुळकर्णी म्हणतो आहे:

    हा हा हा! खूप छान! मला वाटतं ‘नीट’ हा शब्द सुद्धा याच कॅटॅगरित मोडत असावा. नाही का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s