आले नवे वर्ष, नवे कॆलेंडर
पहा भिंतीवर, लटकले
————
नवा निग्रह अन, नवेच संकल्प
जणू कायाकल्प, आयुष्याचा
———-
डायरी, व्यायाम, सकाळचा ’जिम’
पहा बलभीम, निग्रहांचे
————-
यंदा फुललेला, तेरडा-बहर
टिको वर्षभर, मणी म्हणे
———
-संत मणीमहाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.
(प्रथम प्रसिद्धी: मुंबई तरुण भारत १ जाने. २०११)
अतिसुंदर मणिबुवा!
धन्यवाद मिलिंद!
Baryach divasani maniramchya virtual chavanila bhet dili. chan vatale. ek divas punha actual chavanit sahakutumb ashrayas yayacha vichar ahe…. kavita chan ahe…
कधी येताय? अवश्य या. वेळ काढून या. वाचल्या बद्दल व आवर्जून कळवल्या बद्दल धन्यवाद. गेल्या दसर्या पासून मुंबई तरुण भारत साठी हे लिहितो आहे. एखाद-दोन अपवाद वगळता खाडा केला नाही.
chhan..jordar..sagala asacha aahe..pan he asa asu naye hyasathi manimaharajancha kay salla…??
अधिकार तैसा, करु उपदेश
हिंडोनिया देश, नकळे आम्हा
कुणा द्यावा शब्द, कुणा द्यावा सल्ला
मनमधे हल्ला, विचारांचा
नाही साधना नि, नाही तपश्चर्या
बावळट चर्या, निरुत्तर
सकळां समोर, धरावा आरसा,
हाच एक वसा, मणी म्हणे