.
…
.
.
.
.
.
.
.
.
उत्सवाच्या नावे, भक्तीचा बाजार
जाहला बेजार, आसमंत ||
.
नवसाला कुणी, सायासाला कुणी
हव्यासाला कुणी, जमलेले ||
.
जाणतो जो देव, सद्भाव मनीचा
ठणाणा ‘डॉल्बी’चा, कशापायी? ||
.
उत्सवे टिकवा, टिळकांचा हेतू
नसे मनी किंतु, मणी म्हणे ||
.
-संत मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.
(प्रथम प्रसिद्धी – तरुण भारत मुंबई, रविवार दि. ११ सप्टें २०११)








